कल्याण पत्री पूलाचा गर्डरचे काम १० टक्के बाकी

22 Nov 2020 17:10:05


patri pul_1  H

पत्री पूलाचा गर्डरचे काम १०  टक्के बाकी मेगाब्लॉकचा वेळ अपुरा पडला
 
 
 
कल्याण : कल्याण पत्री पूलाचा ७०० मेट्रीक टन वजनाचा भला मोठा गर्डर सरकविण्याचे काम काल पासून सुरु आहे. आज हे काम पूर्णत्वास येणार होते. मात्र मेगाब्लॉक उशिराने सुरु झाला आणि गर्डर सरकविण्याच्या कामाला वेळ अपुरा पडल्याने गर्डर सरकविण्याचे १०  टक्के काम शिल्लक राहिले आहे. १८ मीटर गर्डर सरकविणो बाकी आहे. त्यासाठी उद्या रात्री ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
 


७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर पूलाच्या ठेव्यावर सरकविण्यासाठी शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. शनिवार आणि रविवार प्रत्येकी दोन तासाचा रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. काल चार तासाच्या अवधीत रेल्वे, राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेल्या संयुक्त कामगिरीत ४० मीटर र्पयत गर्डर पुढे सरकविण्यात आला होता. काल कामात कोणताही व्यत्यय आला नव्हता. आज मेगाब्लॉक सुरु करण्यापूर्वी दादर रेल्वे स्थनकानजीक उद्यान एक्सप्रेस बंद पडली. त्यामुळे मेगाब्लॉक सुरु करण्यास उशिर झाला. १० वाजता सुरु होणारा मेगाब्लॉक अर्धा तासाने उशिरा सुरु झाला. मेगाब्लॉक सुरु झाल्यावर चार तासातील एका तासाभरात केवळ १८  मीटर गर्डर पुढे सरकविला गेला. कालच्या तारखेत चार तासात ४०  मीटर गर्डर पुढे सरकला होता. काल आणि आज मिळून ५८  मीटर र्पयत गर्डर पुढे सरकला आहे. मेगाब्लॉकचा अवधी कमी पडल्याने १०  टक्के काम शिल्लक राहिले. १८ मीटर गर्डर अद्याप पुढे सरकविणो बाकी आहे. त्यासाठी रेल्वे अधिका:यांसोबत खासदार शिंदे यांनी चर्चा केली.



१० टक्केच काम बाकी असल्याने उद्या रात्रीत अर्धा तासाच्या दोन मेगाब्लॉक घेतले जातील. केवळ १  तासाभराचे काम शिल्लक आहे. ते उद्या रात्रीत ब्लॉक घेऊन केले जाईल अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. तसेच पुन्हा २७ आणि २८ नाव्हेंबर पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यावेळी ३० मीटर लांबीचा आणखीन एक गर्डर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर आत्ता जो ७६ मीटर लांबीचा गर्डर ठेवला जात आहे .त्याचे काम उद्याच्या ब्लॉकमध्ये पूर्णत्वास येईल. ७६ मीटरचा गर्डर ठेवण्यासाठी काही साधनसामग्री वापरली होती. ती डिमेंटल करण्याचेही काम २७  व २८  नोव्हेंबर रोजीच्या मेगाब्लॉक दरम्यान केली जाणार आहे. ७६ मीटर लांबीचा गर्डर हा ७०० मेट्रीक टन वजनाचा आहे. हा एक मोठा टास्क आहे. रेल्वेवर अशा प्रकारचा इतका मोठा व अधिक वजनाचा गर्डर प्रथम टाकला जात असल्याने तांत्रिक दृष्टय़ा सगळ्य़ा गोष्टी पाहूनच काम केले जाते. टास्क मोठा असल्याने शेवटच्या टप्प्यात वेळ कमी पडली. ९० टक्के काम मार्गी लागले आहे. आत्ता हत्ता गेला आणि शेपूट राहिले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0