बॉलीवूड ड्रग्स प्रकरण : कॉमेडियन भारती सिंह एनसीबीच्या ताब्यात

    दिनांक  21-Nov-2020 14:52:04
|

Bharti Singh_1  
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलीवूडमधील ड्रग्सचे जाळे समोर आले. यामध्ये अनेक जणांची नावे समोर आली. तसेच, अनेक मोठ्या कलाकारांची या प्रकरणी चौकशीही झाली. यामध्ये आता आणखी एक प्रसिद्ध नाव समोर आले आहे. ते नाव म्हणजे, हिंदी चित्रपट तसेच टीव्ही विनोदी कलाकार भारती सिंह. भारती सिंहच्या मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील घरावरसुद्धा छापा मारण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या घरी गांजा सापडला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून अद्याप अधिकृतरीत्या कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.
 
 
 
बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांच्या संदर्भात ड्रग्ज सिंडिकेट तपास करत असलेल्या एनसीबीकडून पुन्हा एकदा मुंबईतील अंधेरी, वर्सोवा याठिकाणी अमली पदार्थांच्या संदर्भात छापेमारी करण्यात आली. भारती सिंहच्या घरी छापा मारल्यानंतर तिच्यासह पतीलादेखील चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतले. यापूर्वी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याघरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) छापा टाकत, ड्रग्ज जप्त केले होते. तसेच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.