'हा आहे शिवसेनेचा नवब्रिगेडी हिंदुत्ववाद...'

    दिनांक  21-Nov-2020 15:58:11
|

mla atul bhatkhalkar_1&nbमुंबई :
लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. किशोरी पेडणेकर यांच्या या विधानाचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी 'हा आहे शिवसेनेचा नवब्रिगेडी हिंदुत्ववाद.. असे म्हणत तीव्र शब्दांत समाचार घेतला.

भातखळकर ट्विट करत म्हणतात,"अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा निश्चिय केलेला दिसतोय.हा आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद..."अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सध्या विविध राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायद्याच्या चर्चांचा जोर आला आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील नेतेमंडळींमध्ये द्वंद्व रंगल्याचे दिसत असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं आहे.तर याआधीही प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच करोना रुग्ण वाढले असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.