बुडत्याचा पोय खोलात ! भाडे तत्वावर बसेस घेऊनही बेस्ट उपक्रम तोट्यात

21 Nov 2020 17:21:24

best_1  H x W:




मुंबई :
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या सेवेतून बाद होणाऱ्या बसेसऐवजी नवीन बस खऱेदी करण्यासाठी बेस्टकडे निधी नसल्याने वेट लीजच्या बसेस घेण्याचा निर्णय झाला. पण तरीही बेस्ट उपक्रम मोठ्या घाट्यात आहे. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्या वेळी खुद्द नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनीच त्यांच्या भाषणातून तशी कबुली दिली आहे.



बेस्ट उपक्रमाचा २०२१-२२ या वर्षीच्या १,८८७.८३ कोटी रुपये तुटीचा बेस्ट समितीत सादर करण्यात आला होता. मात्र त्यावर साधकबाधक चर्चा होऊन शुक्रवारी बेस्ट समितीने अंदाजित अर्थसंकल्प मंजूर केला. तो आता मुंबई महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाचे एकूण उत्पन्न ६,८२,८१४.८१ लाख दाखविण्यात आले आहे. तर उपक्रमाचा खर्च ६,८२,८१२.७४ लाख दाखविण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची एकूण शिल्लक रुपये २.०७ लाख राहते. या शिल्लक रकमतेतून विद्युत पुरवठा विभागाची शिल्लक रुपये ०.६३ लाख विद्युत पुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची एकूण शिल्लक १.४४ लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. त्यावर अध्यक्ष प्रवीण शिंदे त्याचे मत व्यक्त करत होते. भाडेतत्त्वावरील बसेसमुळे २०२१-२२ मध्ये मिळणारे उत्पन्न रुपये २७,२०० लाख असताना खर्च मात्र रुपये ७६,२८८ लाख दाखविण्यात आला आहे.

त्यामुळे ४९,०८८.८३ लाख घट दर्शविण्यात आली आहे. म्हणजे प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी आणि बेस्ट उपक्रमाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी भाड्याच्या बसेस घेण्यात आल्या. मात्र हा तोटा दिवसेंदिवस वाढत जात असून, बेस्ट उपक्रमाची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात'प्रमाणे झाली आहे. यापुढे भाडेतत्त्वावरील बसगाड्या प्रवर्तित करताना बेस्ट उपक्रमाला तोटा सोसावा लागणार नाही, अशा पद्धतीने त्योग्य ती खबरदारी घेण्याचा सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. विशेषतः १ एप्रिल २०२२ मध्ये बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडे तत्त्वावरील गाड्यांची संख्या ३००० असेल. या गाड्यांचे नियोजन नीट झाले नाही तर हा तोटा अधिक वाढण्याची शक्यता विचारात घेता या गाड्यांच्या प्रवर्तनाचे नियोजन नीट व्हावे असे निर्देश प्रवीण शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
Powered By Sangraha 9.0