प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात तक्रार दाखल

02 Nov 2020 15:31:07

Shayar Munawwar_1 &n
 
नवी दिल्ली : फ्रान्समध्ये घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. "हा हल्ला योग्यच होता" असे म्हणत त्यांनी फ्रान्समधील हल्ल्याचे समर्थन केले आणि धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपाखाली लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद पैगंबराच्या व्यंगचीत्रावरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्समध्ये रक्तपात घडला होता. याचे पडसाद भारतामध्येही पहायला मिळाले.
 
 
काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचा जीव घेतला होता. व्यंगचित्र आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्याचे जगभर पडसाद उमटत असताना मुनव्वर राणा यांनी हल्ल्याचे समर्थन केले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा विरोधात कलम १५३(ए), २९५ (ए), २९८, ५०५ सह अन्य कलामांतर्गत खटला दाखल केला आहे.
 
 
शायर मुनव्वर म्हणाले होते कि, "जर धर्म आईसारखाच आहे, तर कुणी आपल्या आईचे किंवा धर्माचे वाईट व्यंगचित्र काढत असेल. शिव्या देत असेल, रागामध्ये ती व्यक्ती असे करण्यासाठी मजबूर असते. मुस्लिमांना चिडवण्यासाठी असे व्यंगचित्र काढले गेले. जगामध्ये हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग होत आहे. अखलाक प्रकरणात काय झाले?, पण तेव्हा कुणालाही त्रास झाला नाही. कुणालाही इतका त्रास देऊन नका की, तो हत्या करण्यासाठी मजबूर होईल." असे वादग्रस्त विधान केले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0