'बीएमसी निवडणुकीत शिवसेनेशी युती नको'

19 Nov 2020 16:04:35

congress _1  H



मुंबई :
महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यास आता काँग्रेसनेत्यांमधूनच विरोधाचा सूर उमटताना दिसतो आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस नेते व विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी बीएमसी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती नको अशी मागणीच केली आहे. त्यामुळे राज्यात हातात हात घालून असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना बीएमसी निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जाणार, याची उत्सुकता आहे.


मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. शिवसेनेसोबत युती करण्याची काहीही गरज नाही, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी ‘एएनआय’शी बोलताना केले आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले असताना काँग्रेसमधूनच विरोधाचा सूर उमटला आहे. २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे इतर चार प्रमुख पक्ष कसे रिंगणात उतरणार,याची उत्सुकता आहे.तर मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते. लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी आजच केला होता. मात्र काँग्रेसच्या विरोधीपक्षनेते रवि राजांनी परस्पर विरोधी मत मांडत या निर्णयाला विरोधच केला आहे.
Powered By Sangraha 9.0