शिवराज सरकारचं 'गौ कॅबिनेट' ; गृहखातं करणार गायीचं संरक्षण

    दिनांक  18-Nov-2020 15:37:21
|

mp government_1 &nbsभोपाळ :
'लव्ह जिहाद' विरोधात कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवराज सरकारने पुन्हा एकदा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात गायीचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र 'गौ कॅबिनेट' स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात पहिली बैठक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विट केले की, "राज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या कॅबिनेट बैठकीसाठी ६ विभागांचा सहभाग असणार आहे. गायींच्या संरक्षणासाठी सर्वच विभाग सामूहिकरित्या यासंदर्भात चर्चा करणार आहेत." राज्यात गोधन संरक्षण आणि संवर्धनासाठी गौ कॅबिनेट गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामिण विकास, महसूल, गृह आणि कृषी कल्याण विभागांना गौ कॅबिनेटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

सरकारच्या या घोषणेनंतर आता या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या पहिल्याच बैठकीत सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गोवर्धन पूजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री चौहान यांनी पत्नी साधना सिंह यांच्यासोबत गोवर्धन पर्वताची परिक्रमा करून पूजा अर्चना केली.पशुपालन विभागाकडूनच गायींच्या संरक्षण आणि प्रजननासंदर्भात काळजी घेईल. त्यासोबतच वन विभागही गायींच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलेल. गृह विभागाकडे संरक्षणाची जबाबदारी देण्यात येईल. राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर हे सर्वच सहाही विभाग तयारीला लागले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.