गुजरात हायवे अपघातात ११ ठार !

18 Nov 2020 14:15:22

Gujrat_1  H x W
 
 
बडोदा : गुजरातमधील बडोदा दुर्तगती महामार्गावर ट्रक आणि मिनी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जवळच्याच एसएसजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
अपघातात जखमी झाल्यालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बडोदा-अहमदाबाद महामार्गावर वाघोडीया चौकात हा भीषण अपघात झाला. डंपर आणि मिनी बसमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयाकडे धाव घेतली आहे. एक लहान मुलासह दोन महिला आणि दोन पुरूषांसह दहा जण या अपघातात ठार झाले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0