कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत मोठी आग

17 Nov 2020 16:32:20

kalyan_1  H x W 
 
                              

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवरील एकोरिना-कॅसोरीना या सोसायटीतील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका घराला मंगळवारी दुपारी आग लागली. एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण अग्नीशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचल्याने त्यांना आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे जीवितहानी झाली नाही.


एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. आगीने संपूर्ण घराला विळखा घातला. ही आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीर्पयत पसरू लागली. मात्र अग्नीशमन दल वेळेवर पोहोचल्याने ही आग इमारतीमध्ये पसरू शकली नाही. मात्र आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. 
दरम्यान सोसायटीत असलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहिती ही समोर येत आहे. ज्यामुळे या आगीमध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित सोसायटीला नोटीस बजावणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

 
Powered By Sangraha 9.0