दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला ; 'जैश'चे २ अतिरेकी ताब्यात

17 Nov 2020 11:36:57

delhi_1  H x W:



नवी दिल्ली :
दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला आणि एक कुपवाडा येथीलया आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांनी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. तसेच या दोघांकडून दोघांकडून स्फोटक आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काल रात्री छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसं जप्त केली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रहिवाशी असल्याचे समजते. अब्दुल लतीफ मीर आणि मोहम्मद अश्रफ अशी त्यांची नावे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना पकडण्यासाठी सराय काले खा येथील मिलेनियम पार्क परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे तिकडे आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.


पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत 


असं सांगण्यात येत आहे की, हे दोघेही सोशल मीडियामार्फत एका दहशतवाद्यांच्या संघटनेच्या संपर्कात आले होते. हे दोघेही पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते. तसेच अनेकदा बॉर्डर पार करण्यात अयशस्वीही ठरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या दोघांबाबत माहिती मिळाली होती. दोघेही २० ते २२ वर्षांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, सध्या या दोघांची चौकशी सुरु असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0