मध्यप्रदेशात 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा होणार !

    दिनांक  17-Nov-2020 16:23:27
|

love jihad_1  Hमध्यप्रदेश :
मध्यप्रदेशात सातत्याने समोर येत असलेले लव्ह जिहाद प्रकरणे थांबविण्यासाठी सरकारने कठोर पावले उचण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकार यासंदर्भात कायदा करणार असल्याची माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. याबाबतचे विधेयक आगामी विधानसभा अधिवेशनात आणले जाईल. कायदा आणल्यानंतर अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल आणि ५ वर्षांची कठोर शिक्षा दिली जाईल. हा भ्रम, मोह आणि धमकावण्याचा गुन्हा ठरेल. त्यांनी माहिती दिली की, “पुढील विधानसभा अधिवेशनात लव्ह जिहादविरोधात कायद्याशी संबंधित विधेयक आणले जाईल. यात ५ वर्षांची कठोर शिक्षा करण्याची तरतूद असेल. धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२०अंतर्गत हे विधेयक सादर करण्यात येईल. प्रस्तावानुसार हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे, जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर एक महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. ”


जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महिना अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे
 
ऐच्छिक धर्मांतरण एक महिन्यापूर्वी सादर करावे लागेल. बर्‍याच प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की स्त्रियांना स्वेच्छेने धर्मांतर करून लग्न करायचे आहे. अशी प्रकरणे पाहता कायद्यात अशीही तरतूद असेल की जर एखाद्याला स्वेच्छेने लग्नासाठी धर्मांतर करायचे असेल तर त्यांना एक महिन्यापूर्वीच अर्ज करावा लागेल. अर्ज न करता धर्मांतर केले तर कठोर कारवाई केली जाईल.


मुख्यमंत्री शिवराज यांनी यापूर्वी 'लव्ह जिहाद'विरूद्ध कायदा करण्याची घोषणा केली होती.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेश सरकार ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदेशीर यंत्रणा बनवण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 'प्रेमाच्या नावाखाली जिहाद होणार नाही. जो कोणी असे कृत्य करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी कायदेशीर व्यवस्था तयार केली जाईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.