दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

15 Nov 2020 15:23:44

chaterjee_1  H


कोलकाता
: बंगाली सिनेसृष्टीतील आणि रंगमंचावरचे ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले. रविवारी (१५ नोव्हेंबर २०२०) रोजी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ८५ वर्षांचे होते. गेल्या ४० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, कोलकत्याच्या 'बेले व्यू क्लिनिक' या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
 

५ ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सौमित्र चॅटर्जी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. गेल्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र ४० दिवसांच्या संघर्षानंतर त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. सौमित्र चॅटर्जी यांनी १९५९मध्ये चित्रपट 'अपुर संसार' मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. सौमित्र चॅटर्जी यांनी ऑस्कर विनिंग दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.


सौमित्र चॅटर्जी यांचा दमदार अभिनयामुळे ते अनेक दिग्दर्शकांचे फेवरेट अभिनेते होते. सौमित्र चॅटर्जी हे पहिले भारतीय होते, ज्यांना कलाकारांना देण्यात येणाऱ्या फ्रान्सचा सर्वात मोठा पुरस्कार 'Ordre des Arts et des Lettres ' ने गौरवण्यात आले होते.. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २००४साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सौमित्र चॅटर्जी हे बंगाली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. सौमित्र यांच्या निधनानंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या लाडक्या दिग्गज अभिनेत्याला सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्यंमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बेले व्यू रुग्णालयात धाव घेतली आहे. वयाच्या 85 मध्येही ते सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर करू शकले नाहीत, त्यामुळेच कोरोनापूर्वीच त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे शुटींग केले होते.
Powered By Sangraha 9.0