आता शिवाजी पार्क नव्हे, 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'

14 Nov 2020 14:58:44

Dadar_1  H x W:
 
मुंबई : दादरमधील सुप्रसिद्ध 'शिवाजी पार्क' मैदानाचे नामविस्तार करून 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे नाव करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" मैदानाबाहेर अशा पाट्या लावल्या आहेत. यामुळे आता हे मैदान "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" मैदान म्हणून ओळखले जाणार आहे. तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आले आहे.
 
 
'माहीम पार्क', नंतर 'शिवाजी पार्क' आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'
 
 
या मैदानाचे नाव "माहीम पार्क" असे होते. १० मे १९२७ रोजी या मैदानाचे "शिवाजी पार्क" असे नामकरण करण्यात आले होते. या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १९६६ मध्ये लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. या मैदानामधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. तसेच या मैदानावर अनेक राजकीय पक्षांच्या सभा संमेलन होत असतात. यामुळे या मैदानाला वेगळी अशी ओळख आहे. याच मैदानावर मुंबई महापालिकेत आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे दसरा मेळावे संपन्न झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0