दै. मुंबई तरुण भारतचा 'आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे' विशेषांक प्रकाशित

14 Nov 2020 22:04:02

special_1  H x


पुणे दि. १४ : आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांच्या पुण्यातील मुळा मुठा नदीच्या संगमावरील समाधी स्थानाजवळ "तरुण भारत, मुंबई" यांनी प्रकाशित केलेला "आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे" विशेषांक याचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत समरसता गतिविधि संयोजक श्री. मकरंद ढवळे, पुणे महानगराचे समरसता गतिविधि संयोजक श्री. शरद शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे युवराज दाखले हे हे युवा कार्यकर्ते तसेच संदीपन झोंबाडे हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ पार पडला. यानंतर या सर्व मान्यवरांनी या अंकाविषयी तसेच क्रांतिगुरू यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मातंग समाजाचे प्रश्न, 'क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक' या संदर्भातील माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. अशोक लोखंडे यांनी सर्वांच्या समोर ठेवली. उपस्थितांच्या मध्ये अनेक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये श्री.अमित गोरखे, श्री. आनंद रिठे, श्री.अविनाश बागवे, श्री. सोनवणे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0