ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या जवानांना वीरमरण

14 Nov 2020 14:04:50

Maharashtra_1   
मुंबई : ऐन दिवाळीच्या पूर्व संध्येला संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय लष्करांसोबत पाक सीमेवर चकमक घडली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील बहिरेवाडीचे ऋषिकेश जोंधळे तर नागपूरचे भूषण सतई हे दोन वीरजवान शहीद झाले आहे. सर्वात दुःखाची बाब म्हणजे ऋषिकेश जोंधळे हे अवघ्या २० वर्षांचे होते. तर, नागपूरचे भूषण सतई हे २८ वर्षांचे होते.
 
 
ऐन दिवाळीत ऋषिकेश जोंधळे यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकल्याने संपूर्ण बहिरेवाडीमध्ये शोककळा पसरली. ऋशिकेष हे राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्यांची भारतीय लष्करात भरती झाली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या संघर्षात त्यांना वीरमरण आले आहे. तसेच, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे भूषण सतई अगदी वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते.
 
 
महाविद्यालयात असतानापासूनच भूषण यांनी सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. गुरेज सेक्टर येथे भूषण कार्यरत असताना पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रतिउत्तर दिले. ज्यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानाना वीरमरण आले. यामध्ये भूषण यांचा सहभाग आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0