जनकल्याण सहकारी बँकेतर्फे लघुउद्योजकांना धनादेश वितरण

    दिनांक  13-Nov-2020 15:42:38
|
Darekar _1  H x
 


सन्मान कर्ज योजनेतून धनादेश वितरण  

मुंबई : लॉकडाऊननंतर अडचणीत सापडलेल्या छोट्या आणि लघू उद्योगांना सन्मानाने उभे राहता यावे, यासाठी जनकल्याण सहकारी बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या सन्मान कर्ज योजनेअंतर्गत गरजूना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नानाजी देशमुख प्रतिष्ठान, रविंद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले.
 
 
लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या उद्योजकांना हातभार म्हणून कर्जाचे निम्मे व्याज या संस्था भरणार आहेत, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होते. तसेच जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, भाजप नगरसेवक अभिजीत सामंत, उत्तरप्रदेश आघाडीचे संजय पांडे आदी मान्यवरही उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.