कोरोनावर लसीकरण लवकरच सुरू होणार !

13 Nov 2020 17:35:17
KEM_1  H x W: 0


केईएममध्ये १००; तर नायरमध्ये १४८ जणांवर चाचणी यशस्वी

 
 
मुंबई : मुंबईतील केईएममध्ये आतापर्यंत १००; तर नायर रुग्णालयात १४८ स्वयंसेवकांना कोव्हीशिल्डची लस देण्यात आली आहे. याचा कुठलाही विपरित परिणाम स्वयंसेवकांवर झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या कोविल्ड शिल्डचे परिणाम यशस्वी होत आहेत. आता दिवाळीनंतर उर्वरित ५४ स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशिल्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे.
 
 
 
सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयात स्वयंसेवकांना कोविशिल्ड लस दिलेल्यांपैकी कुणालाही साईड इफेक्ट दिसलेले नाहीत. त्यामुळे नायर व केईएम रूग्णालयात सुरु असलेल्या कोविशिल्ड लसीची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस देवून एक महिना उलटल्यानंतरही एकाही व्यक्तीला कोणतेही साईड इफेक्ट किंवा शारिरिक त्रास झालेला नाही. नायर आणि केईएम या दोन रुग्णालयांमध्ये २४८ जणांना ही लस दिली होती. तसेच सायन रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीची चाचणी येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. सायनमध्ये एक हजार जणांवर कोव्हॅक्सीन लसीची चाचणी पुढील तीन ते चार दिवसांत सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Powered By Sangraha 9.0