बॉलीवूड ड्रग्स प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबीसमोर

13 Nov 2020 12:40:04

Arjun Rampal_1  
 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला आहे. अर्जुनचा मित्र पॉल बार्टल याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरू आहे. याच प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव पुढे आले होते. आता त्याचा मित्र आणि ऑस्ट्रेलियन नागरिक पॉल बार्टल याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅबरीयल हिची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.
  
 
 
अमली पदार्थ तस्करी संदर्भात आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. पहिली अटक अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ एगिसलोस डेमेट्रिएड्सला झाली होती. आता अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टलला अटक झाली आहे. बुधवारी रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पॉलच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरी काही अमली पदार्थ आढळले होते. त्यानंतर त्याला समन्स पाठवले आणि गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0