राहुल गांधी हे चिंताग्रस्त नेते : बराक ओबामा

13 Nov 2020 12:19:56

Rahul Gandhi_1  
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला आहे. "कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे चिंताग्रस्त आणि कमी योग्यतेचे नेते आहेत. त्यांना आपआपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्यांच्याकडे विषयामध्ये प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि उत्कटतेची कमतरता असल्याने त्यांना अपयश येत आहे." असे ओबामा यांनी पुस्तकामध्ये म्हंटले आहे.
 
 
"राहुल गांधी अशा विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्यांच्या तेवढी उत्कटता नाही," असे वर्णन त्यांनी राहुल गांधींचे केले आहे. तसेच, मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांना 'प्रचंड निष्ठा ठेवणारे व्यक्ती' असे म्हटलं आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे शिकागो मशीन चालवणारे मजबूत आणि धुर्त बॉसची आठवण करून देतात, असे ओबामा यांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0