श्रीराममंदिर निर्माणाच्या जल्लोषात अयोध्येत यंदाची दिवाळी खास

    दिनांक  12-Nov-2020 16:19:31
|

अयोध्या _1  H x
अयोध्या : श्रीराम मंदिर निर्माण करण्याच्या निर्णयानंतर दीपोत्सवासाठी रामनगरीचे साधुसंत आणि भक्तांमध्ये उत्साह आहे.अयोध्येत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही दिवाळीची खास तयारी करण्यात येत आहे.योगी सरकारने २०१७मध्ये दिपोस्तावास सुरुवात केली. पहिल्यावर्षीपासूनच गिनीच वर्ल्ड रेकोर्ड करणाऱ्या अयोध्यानगरीत यंदाचा दिवाळ सण खास असणार आहे याचे कारण म्हणजे अयोध्या नगरीला १६ शृंगारांनी सजवले जाणार आहे. या निमित्ताने अयोध्येतील २४ घाट दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन २०१७ पासून अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली होती. तसेच त्यावेळी १ लाख ६५ हजार दीप उजळण्यात आले होते. तसेच सन २०१८ मध्ये ३ लाख १५० दिवे लावण्यात आले . त्यावेळी जागतिक विक्रम झाला होता. यानंतर सन २०१९मध्ये ५ लाख ५१ हजार दिवे लावून जागतिक विक्रम रचला गेला होता. यंदा दिवाळीत कोरोनाचा प्रोटोकॉल लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करण्यासाठी सर्व प्रकारची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. २४ घाटांवर ६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. यासाठी २९ हजार लीटर तेलाचा वापर करण्यात येणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्येला प्रकाशमान करण्यासाठी ७.५ लाख किलो रुईचा देखील वापर होणार आहे. दीपोस्तवानिमित्त या वेळी अयोध्या ५ लाख ५१ हजारांहून अधिक दिव्यांनी झगमगून जाणार आहे. यामुळे अयोध्या नगरीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.