कल्याण-डोंबिवलीत तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा प्रशासकीय राजवट

    दिनांक  11-Nov-2020 17:33:07
|
 
KDMC_1  H x W:
 
 
 
                                

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून कोरोना इफेक्टमुळे निवडणूक कार्यक्रम ही जाहीर झाला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नियमानुसार प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. एके काळी प्रदीर्घ कालवधीसाठी प्रशासकीय राजवट उपभोगलेल्या कल्याण-डोंबिवलीत तब्बल 25 वर्षा नंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.
 

कल्याण-डोंबिवलीमध्ये यंदाचे वर्ष हे निवडणूकीचे वर्ष होते. त्यादृष्टीने प्रस्थापित नगरसेवकांसह नवख्या आणि इच्छूक उमेदवारांनी ही कंबर कसली होती. पण कोरोनामुळे या सगळ्य़ांच्या स्वप्न धुळीस मिळाली आहेत. मार्च महिन्यात कोरोना आला. त्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी कोरोनामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित सर्व कामे लांबणीवर पडली. कल्याण डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ही संपुष्टात आल्याने याठिकाणी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिके च्या संपूर्ण कारभाराची सूत्रे ही प्रशासनाचे प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त यांच्या हातात जातात. कडोंमपाची सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधी निवडून येत नाही तोर्पयत महापालिका आयुक्त म्हणजेच डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीची जबाबदारी असणार आहे.
 
 
दरम्यान 1983 मध्ये नगरपालिकेची महापालिका स्थापन झाल्यानंतर याठिकाणी प्रशासकीय राजवट लागू केली होती. 1995 ची सार्वत्रिक निवडणूक होईर्पयत म्हणजेच तब्बल 12 वर्ष ही प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती.
प्रशासकीय राजवट लागू करण्याबाबतची अधिसूचना शासनाने काढली आहे. मात्र अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणो टाळलेला नसून मुख्यत्वे त्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय पत्रीपूल, वडवली, कोपर पूल यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहे. रिंगरूट, पीपीपी हॉस्पिटल उभारणी, मेडीकल कॉलेज प्रस्ताव, प्रशासकीय इमारतीसाठी या कालवधीत गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.