यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत ; मात्र विरोधकांचा आक्षेप

10 Nov 2020 17:09:13

Winter Session_1 &nb
 
मुंबई : सध्याचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये घेतले जाणार आहे. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज विधिमंडळ कामकाज समिती बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी किती असावा याबाबतचा निर्णय १ डिसेंबर रोजी परिस्थीतीचा आढावा घेऊन ठरवला जाणार आहे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.
 
 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरात घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत. कायद्याप्रमाणे वर्षातील एक अधिवेशन हे नागपुरात घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. ते म्हणाले की, "किमान १५ दिवस हे अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही अशी सरकारची भूमिका दिसत आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती."
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0