‘काव्यप्रेमी शिक्षक मंचा’तर्फे आयोजित ‘काव्यप्रेमी काव्य महोत्सव’ संपन्न

10 Nov 2020 22:24:03

8_3  H x W: 0 x
मुंबई : ‘काव्यप्रेमी शिक्षक मंचा’तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन संपन्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी आनंद घोडके यांच्या नेतृत्वात लावल्या गेलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज विशाल वृक्षात रूपांतर होऊन त्याला गोड फळे आली आहेत. एक सुदृढ साहित्यिक चळवळ म्हणून मंचाकडे आज पाहिले जात आहे.
 
८ नोव्हेंबरला मंचातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. यात २२० कवींनी भाग घेतला. सकाळी पहिल्या सत्रात शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर दहा तास चाललेले व दहा सत्रांत विभागणी करण्यात आलेले हे संमेलन अतिशय नेटकेपणे संपन्न झाले. याचे थेट प्रसारण युट्यूबवर झाले.
 
कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करून एक अतिशय रेखीव काव्य संमेलन पार पडले. संपूर्ण काव्य संमेलन युट्यूबवर उपलब्ध आहे. तसेच साहित्यिक आणि समाजसेवक डॉ. मिलिंद शेजवळ यांची काव्यप्रेमी शिक्षण मंचच्या सेक्रटरीपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. मिलिंद शेजवळ यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 


8_1  H x W: 0 x
 
मुंबई : रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे विक्रोळी येथे नुकतेच गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाग संघचालक विश्वनाथ सावंत, श्रीनिवास तल्ला, सोहन पटले, अजित कंबोज, महेंद्र खोत, कॅप्टन दिलीप कोपिकर उपस्थित होते.
 
 

8_2  H x W: 0 x

 
 
मुंबई : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. ११७ विक्रोळी येथे नुकतेच रजनी रवींद्र कदम, ईशान्य मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्ष यांच्यावतीने दिवाळी सणानिमित्त पणत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रजनी कदम म्हणाल्या की, ”खा. मनोज कोटक तसेच विक्रोळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार यांचे नेहमीच मार्गदर्शन असते. काही दिवसांपूर्वी गरजूंना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रमही योजला होता.” यावेळी जिल्हा उपाध्यक्ष: रवींद्र कदम, प्रभाग अध्यक्ष : विरेंद्र महाडिक, महिला प्रभाग अध्यक्ष: प्रेरणा सरवणकर, युवा प्रभाग अध्यक्ष : संदीप फगरे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0