गुजरातमध्येही भाजपच आघाडीवर !

10 Nov 2020 15:23:44

BJP_1  H x W: 0
गुजरात : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गुजरातमधील पोटनिवडणुकीचादेखील निकाल आज जाहीर होणार आहे. यावेळी गुजरातमध्येही भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले आहे. गुजरात पोटनिवडणुकांच्या दुपारपर्यंतच्या कलांमध्ये भाजप आठही जागांवर पुढे आहे. गुजरातमध्ये ८ जागांवर पोट निवडणुका आवश्यक झाल्या होत्या. कारण जूनमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या बरोबर पहिले काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामा दिला होता.
 
 
 
भाजपच्या राज्यसभा जागा कायम राखण्यासाठी ज्या ८ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यामधील ५ जणांना भाजपने तिकीट दिले आहे. गुजरातमध्ये पोट निवडणुकांचे निकाल सरकारवर सरळ परीणाम करणार नाही. कारण तेथे भाजपजवळ १८२ सदस्यांच्या सदनामध्ये १०३ मते आहेत. तर काँग्रेस जवळ केवळ ६५ जागा आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0