बिहार निवडणूक २०२० : बिहारमध्ये भाजपच्या एनडीएची आघाडी

10 Nov 2020 12:13:06

Bihar Election_1 &nb
 
नवी दिल्ली : आज बिहार निवडणुकीचा निकाल लागणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तर, दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप व जनता दल (यु)च्या एनडीएने १३१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रीय जनता दल - काँग्रेसची महाविकास आघाडी ९८ जागांवर आघाडीवर आहे.
 
 
 
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. आज सकाळी तेथे मतमोजणी सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि लालूप्रसाद यांचे पूत्र तेजस्वी यादव यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चुरस आहे. आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन आघाडीवर होते. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या गोटात उत्साह पसरला होता. मात्र, आता भाजपने ७३ जागांवर आघाडी मिळवली असून जनता दल (यु) ४८ जागांवर आघाडीवर आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0