निकीताला न्याय द्या ! : फरीदाबादमध्ये चक्का जाम

01 Nov 2020 15:46:35
Faridabad_1  H




नवी दिल्ली
: हरियाणाच्या वल्लभगडमध्ये रविवारी एकच गर्दी जमली आहे. फरीदाबाद-वल्लभगड महामार्ग संपूर्णरीत्या चक्काजाम करण्यात आला आहे. निकीता तोमर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी गावात एक महापंचायत बोलवण्यात आली आहे. त्यात निकीताला न्याय मिळावा, असा ठराव मांडण्यात आला आहे. यानंतर जमाव तीव्र झाला. फरीदाबाद-वल्लभगड हायवेवर चक्काजाम करण्यात आले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करण्यात आला आहे.
 
 
महापंचायतीत फरीदाबादच्या एनआयटीचे आमदार नीरज शर्मा यांच्यावर कुणीतरी चप्पल फेकली आहे. त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. कित्येक वाहने, आजूबाजूची दुकाने ढाब्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीसांनीही लाठीचार्ज केला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, उपद्रविंची माहिती घेऊन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 

नेमके प्रकरण काय ?
२६ ऑक्टोबर रोजी फरीदाबादच्या वल्लभगडमध्ये बी.कॉमचा पेपर देऊन येणाऱ्या २१ वर्षीय निकीताची गोळी मारून हत्या करण्यात आली. हत्येतील आरोपी नूँहहून काँग्रेस आमदार आफताब अहमद यांचे चुलत भाऊ तौसीफ, मित्र रेहान आणि एक अजरुद्दीन यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात सुरू ठेवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0