जामीन मिळाल्यानंतरही लालू राहणार तुरुंगातच...

09 Oct 2020 12:38:23
lalu yadav_1  H


चारा घोटाळा प्रकरणात जामीन 

 
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात जामीन मिळाला आहे. मात्र, लालूंचा मुक्काम तूर्त कोठडीतच असणार आहे. दुसऱ्या एका प्रकरणी जामीन मंजूर न झाल्याने लालू अद्याप तुरुंगातच राहण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणात एका महिन्यानंतर जामीन मिळणार आहे. चारा घोटाळा आणि अन्य प्रकरणाशी संबंधित सुनावलेल्या शिक्षेच्या ५० टक्के शिक्षा लालू यांनी भोगली आहे.
 
 
 
 
बिहार विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजली आहे. मात्र, लालू यादव यांचा यात सक्रीय सहभाग नसल्याने ही निवडणूक काहीशी रंगलेली नाही. झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चाईबासा कोषागार प्रकरणात ३७ कोटींच्या गैरव्यवहारासाठी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत अर्धी शिक्षा पूर्ण झाल्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने संमती दिली आहे. मागील सुनावणीत सीबीआयतर्फे सांगण्यात आले होते की, लालू यादव यांनी २९ महिने तीन दिवसांची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत टळली होती.
 
 
 
दरम्यान, लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यातील तीन विविध प्रकरणात दोषी आढळले आहेत. २३ सप्टेंबरपासून २०१७ ते तुरुंगाची हवा खात आहेत. मे २०१८ मध्ये लालू यांना उपचारासाठी अंतरिम जामीन देण्यात आला होता. न्यायालयाने त्यानंतर तो रद्दही केला होता. ऑगस्ट २०१८ पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


 
 
Powered By Sangraha 9.0