ग्रंथालय चालक राजदरबारी

08 Oct 2020 17:11:49
Raj Thackery_1  



ग्रंथालये सुरू करण्याची मागणी करण्यासाठी घेतली राज ठाकरेंची भेट

 
 
 
 
कल्याण : राज्य सरकाराने अनलॉक पाच मध्ये हॉटेल, रेस्टारंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आता ग्रंथालये सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रंथालये सुरू करण्याबाबत कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयासह इतर प्रमुख वाचनालयाच्या पदाधिका:यांनी गुरूवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. 
 
 
 
ग्रंथालये ही मार्च महिन्यापासून लॉकडाऊन मुळे बंद आहेत. वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम ग्रंथालये करीत असतात. ग्रंथालये बंद राहिल्यास वाचनसंस्कृती लोप पावेल अशी भिती वाचनालय चालकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रंथालये बंद असल्याने कर्मचा:यांवर ही उपासमारीची वेळ आली आहे. विविध वाचनालयांच्या पदाधिका:यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेत वाचनालये सुरू करण्याबाबत चर्चा केली.
 
 
 
यावेळी कल्याण, नवी मुंबई, ठाणे, वांद्रे, दादर आधी ठिकाणाच्या वाचनालयाचे पदाधिकारी ही उपस्थित होते. राज ठाकरे यांनी त्वरीत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी येत्या दोन दिवसात ग्रंथालय सुरू करण्याबाबत नोटिफिकेशन काढण्यात येईल,अशी हमी सामंत यांनी दिल्याची माहिती कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे भिकू बारस्कर यांनी दिली. यावेळी बारस्कर यांच्यासह कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोशी हे देखील उपस्थित होते.




Powered By Sangraha 9.0