केडीएमसीत प्लास्टीकविरोधी कारवाईला विरोध : गुन्हा दाखल

08 Oct 2020 16:58:47
KDMC_1  H x W:

अधिकाऱ्यांना केलेली शिवीगाळ भोवली




कल्याण
: कल्याण डोंबिवली महापालिकेने प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणा:या व्यापा:यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला असता त्यांच्या विरोधात प्रशासनाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
लक्ष्मी मार्केटमध्ये प्लास्टीक पिशव्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक पोहचले असता काही विक्रेत्यांनी दंडाची रक्कम भरली. मात्र काही व्यापा:यांनी दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला. आधीच धंदा होत नाही. त्यात ही कारवाई केल्यास आम्ही काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. पाच हजार रुपयांचा धंदा होत नाही. तर पाच हजार रुपयांचा दंड कूठून व कसा भरायचा सवाल उपस्थित करीत कारवाई पथकासोबत हुज्जत घातली.
 
 
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पालिकेने विरोध करणा:या व्यापा:यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हीडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्लास्टीक पिशव्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. गेल्याच महिन्यात पाच लाख रुपयांर्पयत दंड वसूल केला होता. प्लास्टीक पिशव्यांचा वापर करुच नये. कोरोना काळात ही बाब
अत्यंत गंभीर आहे.
 
 
 
कारण कोरोना व्हायरस हा प्लास्टीकवर जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे प्लास्टीक पिशव्यांच्या विरोधातील कारवाईही कोरोना काळात सगळ्य़ात महत्वाची आहे. प्लास्टीक पिशवी व्यापा:याला ग्राहकास फुकूट द्यावी लागते. त्याऐवजी त्याने कापडी पिशवी ग्राहकाला दिल्यास दहा रुपयांच्या पिशवीत तीन रुपयांचा फायदा होऊ शकतो. याकडेच व्यापारी कानाडोळा करीत आहेत. त्यात त्यांचेच नुकसान आहे. एकीकडे प्लास्टीक कारवाई प्रभावीपणो राबविली जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिका प्लास्टीक विरोधी कारवाई प्रभावीपणो राबवित नसल्याचे सांगत आहे.




Powered By Sangraha 9.0