केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

08 Oct 2020 21:04:42

ramvilas paswaan_1 &


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिलीय.




'बाबा... तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात' असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.
.
Powered By Sangraha 9.0