कोरोनाविरोधात लढाई एकीने लढूया !

    दिनांक  08-Oct-2020 19:10:19
|

pmo_1  H x W: 0नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ट्वीट करत, सर्व जनतेला कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले. कोरोनाविरुद्धच्या महत्वपूर्ण संदेशाचा पुनरुच्चार करत, त्यांनी म्हटले. “मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर राखा आणि ‘दो गज की दुरी’या मंत्राचे पालन करा. आपण सर्वजण एकत्रितपणे कोविड-१९ विरुद्धचे युध्द जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच्या या मोहिमेस आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शविला आहे. सलमान खानपासून कृती सॅनॉन आणि देशाच्या राष्ट्रपतींनी या मोहिमेच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत.


पं


तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून संदेश दिला की आम्हाला एकत्र कोरोनाशी लढावे लागेल. त्याने यासाठी एक हॅशटॅगदेखील वापरला आहे. #Unite2FightCorona! त्यांनी कोरोना बचाव प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. या लढाईत जनसहभाग वाढावा, या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, सर्वांना कोविड-१९ विषयक प्रतिज्ञा दिली जाईल. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांकडून एक सुनियोजित आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :


ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण अधिक आहे, अशा ठिकाणी प्रदेश केंद्री निश्चित संपर्क वाढवणे.
प्रत्येक नागरीकापर्यंत पोहचता येईल, असे साधे, सोपे आणि आकलनास सहज असे मेसेज.

सर्व प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करुन देशभरात हे संदेश पोहोचवणे.
 
सर्व सार्वजनिक जागांवर बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे; आघाडीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याना सोबत घेत

सरकारच्या योजनांच्या लक्ष्यीत लाभार्थीपर्यंत पोहचवणे.

सरकारी कार्यालयांमध्ये होर्डींग्स/भित्तीपत्रे/ इलेक्ट्रोनिक डिस्प्ले बोर्ड अशा साधनांचा वापर करून जनाजागृती.

स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रभावी व्यक्तींचा सहभाग घेऊन त्यांच्या मार्फत,घरोघरी संदेश पोहचवणे

जागोजागी जनजागृती कायम सुरु व्हावी या दृष्टीने मोबाईल व्हेन आणि दृकश्राव्य मेसेज पाठवणे छोट्या
पुस्तिका/?ब्रोशर्स च्या माध्यमातून जनजागृती करणे.

कोरोनाविषयक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावेत, यासाठी, स्थानिक केबल चालकांची मदत घेणे.

कोरोनावर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी सर्व उपलब्ध व्यासपीठांवरून समन्वित प्रसार-प्रचार मोहीम राबवणे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.