“स्टार प्रचारक बिहारमध्ये उरलीसुरली अब्रू घालवणार”

08 Oct 2020 13:05:09


shivsena_1  H x 
 
 
मुंबई : बिहार निवडणुकीचे बिगुल वाजताच महाराष्ट्रामध्येही राजकारणाला वेग आले. कारण, शिवसेनादेखील बिहार निवडणूक लढवणार आहेत. यावर आता शिवसेनेकडून निवडणुकीसाठी २० स्टार प्रचारक सज्ज असल्याचे सांगण्यात आले. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका करत, ‘ते स्टार प्रचारक उरलीसुरली अब्रूही घालवणार’ असे म्हंटले आहे.
 
 
 
 
 
 
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले की, “या स्टार कॅम्पेनर्सना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचले नाही हा इतिहास आहे,” असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला.
 
 
बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0