मेरा बाबा देश चलाता था!

    दिनांक  07-Oct-2020 14:18:09
|
1_1  H x W: 0 x
 


जवान शैलेंद्र प्रताप सिंह यांना भावूक वातावरणात निरोप जम्मू : काश्मीरच्या सोपोर भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सीआरपीएफ जवान शैलेंद्र प्रताप सिंह यांचे पार्थीव गावात पोहोचल्यावर या सच्चा देशभक्ताची एक झलक पाहण्यासाठी ग्रामस्थांची एकच रीघ लागली होती. प्रत्येकाने जड अंतःकरणाने त्यांना डोळ्यात पाणी साठवून निरोप दिला. भारत माता की जय, वंदे मातरम्, अशा घोषणा देत भारतमातेच्या या सुपूत्राला अभिवादन करण्यात आले. शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या जाण्याने हळहळणाऱ्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.
 
  

1_1  H x W: 0 x 
 
 
 
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा गावात सुरू होत्या. ग्रामस्थांनी जवानाच्या पार्थीवावर फुले वाहत श्रद्धांजली अर्पण केली. आईचा प्राण कंठाशी आला होता. पत्नी रडता रडता बेशुद्धावस्थेत होऊन कोसळली. लहान मुलगा कुशाग्रचा बापाला या अवस्थेत पाहून आक्रोश इतका होता की कुणाच्याही डोळ्यात पाणी तरळेल. निरोप घेताना आपल्या वडिलांना केलेला सलाप पाहून उपस्थित साऱ्यांचे उर अभिमानाने भरून येत होते मात्र, भारतमातेच्या सुपूत्राला निरोप देताना डोळेही ओले होत होते.
 


1_2  H x W: 0 x 
 
 
अल्होरा डलमऊ क्षेत्रातील मीरानपूर भागात राहणाऱ्या सीआरपीएफ जवान शैलेंद्र प्रताप सिंह यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना प्रतिकार करत असताना दे हुतात्मा झाले. आपला मुलगा हुतात्मा झाल्याची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर घरच्यांवर डोंगर कोसळला होता. आई, मुलगा आणि पत्नी त्यांच्या पार्थीवाची वाट पाहत होते.
 

1_4  H x W: 0 x 
 
 
 
चार वाजता लखनऊहून पार्थीव जिल्ह्यात आणण्यात आले. रस्त्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली. बछरावा या ठिकाणाहून जवाहर विहार कॉलनीतील त्यांच्या घरापर्यंत ही रीघ लागली होती. वस्तीतील लोकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीसाठी आधीपासूनच व्यवस्था ठेवण्यात आली होती. निरोप देताना मात्र, संपूर्ण वातावरण भावूक झाले होते. साऱ्यांनी शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.
 
 


1_5  H x W: 0 x 
 
 
 
आई सिया दुलारी सिंह, वडिल नरेंद्र बहादुर सिंह, पत्नी दीपा सिंह, बहिणी शीला, प्रीती, ज्योति आणि मुलगा यांच्या डोळ्यातील अश्रू ओघळतच होते. प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते. इतर गावातील मंडळी घरच्यांना धीर देत होते. एकीकडे शैलेंद्र यांच्या जाण्याचे दुःख होते तर दुसरीकडे दहशतवादी हल्ल्याचे दुःख होते. सहकारी सीआरपीएफ जवान व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हुतात्मा जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.