मानलं या रामभक्तांना ! ४५०० किमीहून अयोद्धेत आणली ६१३ किलोची घंटा

    दिनांक  07-Oct-2020 13:46:53
|
Photo - Ram mandir trust_
 
 
 
 
अयोद्धा : राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी विविध संकल्प सोडणारे आणि देशभरातून विटा आणणारे कारसेवक संपूर्ण देशाने पाहिले. मात्र, तमिळनाडूतील रामेश्वरम येथील रामभक्तांनी मंदिरासाठी ६१३ किलो वजनाची घंटा दान केली आहे. रामेश्वरम ते अयोद्ध्या असा ४५०० किलोमीटरचा प्रवास करून ही घंटा रामलल्ला चरणी अर्पण केली आहे. लीगल राईट काऊन्सिलतर्फे ही घंटा भेट म्हणून देण्यात आली आहे.
 
 
१७ डिसेंबर रोजी रामेश्वरम येथून निघालेली राम रथयात्रा २१ दिवसांत १० राज्यांतून प्रवास करत अयोद्धेत पोहोचली आहे. या यात्रेत एकूण १८ जणांचा सहभाग होता. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्रात पूजनानंतर आत्तापर्यंत राम मंदिर विश्वस्त ट्रस्टला हजारो भक्तांनी दान दिले आहे. तमिळनाडूच्या राजलक्ष्मी मांडा यांच्याहस्ते ही घंटा भेट देण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के महासचिव चंपत राय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.