“आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा”

07 Oct 2020 15:55:26

Rahul Gandhi_1  
 
 
मुंबई : एकीकडे देशात कॉंग्रेस राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोर्चे, आंदोलने करत आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोनाकाळातील कामावर विरोधक चांगलाच समाचार घेत आहेत. “आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असते.” असे म्हणणाऱ्या राहुल गांधींना ‘आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा’ असे म्हणत पुन्हा महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
 
 
 
 
राहुल गांधी कुरुक्षेत्र येथे झालेल्या एका सभेत म्हणाले की, “चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. जर आमचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकले असते.” त्यांच्या या दाव्यावार भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. त्यांनी ट्विट केले की, “राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.” असा टोला लगावला.
 
 
Powered By Sangraha 9.0