भौतिक शास्त्राचे नोबेल जाहीर ; यंदा 'या' ३ शास्रज्ञांचा सन्मान

    दिनांक  06-Oct-2020 19:03:28
|

nobel prize_1  स्टॉकहोम :
जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा ३शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या ३ शास्रज्ञांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केले. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचे हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या तिघांनाही ११ लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिले जाणार आहे.


रॉजर पेनरोझ यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून १९५७ ला डॉक्टरेट मिळवली आहे. पेनरोझ सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्लॅकहोल फॉर्मेशनला आईनस्टाईनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले. ब्लॅकहोल संदर्भातील पेनरोझ यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे.

रेनहार्ड गेंजेल यांनी जर्मनीतील बोन विद्यापीठातून १९७८ डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. गेंजेल अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. एन्ड्रिया गेज यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी मिळवली असून त्यादेखील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. गेंजेल आणि गेज यांची संस्था १९९० पासून ब्लॅकहोल संदर्भात संशोधन करत आहे.

काल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.