१५ ऑक्टोबरपासून होणार शाळा सुरु, पण...

06 Oct 2020 09:50:22

Schools_1  H x
 
नवी दिल्ली : देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार असून यासाठी शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमांचे काटेकोर पालन करूनच शाळा सुरु करण्यात याव्या अशी अट सरकारने घातली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात असं सांगत नव्या नियमांमध्ये अनेक अटीही टाकण्यात आल्या आहेत.
 
 
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणे हे बंधनकारक नाही. घरी बसूनही ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असेही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर २ ते ३ आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. शाळांनीही स्वच्छता आणि कोविडचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0