दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला ; २ जवान हुतात्मा

05 Oct 2020 16:24:41

Jammu Kashmir_1 &nbs
 
नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरच्या पंपोर जवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी समोर आली. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. अद्यापही घटनास्थळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
भारतीय लष्करच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंपोरच्या कांधीजल पुलावर सीआरपीएफच्या ११० बटालियनचे जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिस रोड ओपनिंग ड्यूटीसाठी (आरओपी) तैनात करण्यात आले होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून पाच जवान जखमी झाले आहेत. या परिसराची घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0