मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे 'ती' मुलं आईला मुकली

05 Oct 2020 19:29:45

omen fallen in manhole BJ

मुंबई :
घाटकोपर असल्फा व्हिलेज येथील एक महिला गटारात पडून वाहून गेली, तिचा मृतदेह हाजी अली समुद्रकिनारी सापडला. या घटनेवरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर टीकास्त्र सोडले.या गटाराचे काम करणाऱ्या कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.


याबाबत किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की, शनिवारी संध्याकाळच्या मुसळधार पाऊस सुरु होता, तेव्हा असल्फा व्हिलेज येथे राहणारी ही महिला गटारात पडून वाहून गेली. त्या गटारांवर पूर्वी सिमेंटचे ढापे बसवलेले होते, परंतु जानेवारीत गटरांचे काम केल्यावर निकृष्ट दर्जाचे ढापे बसवले होते. अग्निशमन दल, पोलीस या महिलेचा शोध घेत होते. परंतु सदर महिलेचा मृतदेह पहाटे ३ च्या सुमारास वरळीतील नाल्यात सापडला असं त्यांनी सांगितले.



तसेच त्या महिलेला २ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षाचा मुलगा आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली आहेत. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. गटाराचे काम करणारा कंत्राटदार व महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, या महिलेचा मृत्यूला जबाबदार कोण? या घटनेबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0