पोलीस ठाण्यासमोरच भाजप नेत्याची हत्या ; प. बंगालमधील प्रकार

05 Oct 2020 12:14:48

Manish Shukla_1 &nbs
 
 
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालमधील २४ परगना जिल्हातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत शुल्का यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप तेथील भाजप नेत्यांनी केला आहे.
 
 
 
भाजप नेते मनीष शुल्का यांच्या हत्येनंतर भाजप नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन नागरिकांना केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शुल्का रात्री ८च्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील भाजप पक्ष कार्यालयात बसले होते. त्याच वेळी दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष यांना प्रथम बॅरेकपूर येथील बीएन बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील गंभीर अवस्था पाहून अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0