नेपाळमध्ये कोरोना! पीएम ओलींसह ७६ सुरक्षारक्षकांना लागण

    दिनांक  04-Oct-2020 17:10:58
|
PM Oli_1  H x W
 
 
 
 
 
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान ओली यांचे कार्यालय निर्जंतुकीकरण करून बंद करण्यात आले आहे. के.पी.ओली यांच्यासह त्यांचे खासगी सल्लागार आणि डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहे. त्यांच्यासह ७६ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
 
 
नेपाळी वृत्तसंस्थेनुसार, नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान कार्यालयातही अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे.
 
 
पंतप्रधान के.पी.ओली डॉक्टर डॉ. दिव्या शाह यांना कोरोना संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पंतप्रधान ओली यांच्या सुरक्षेसाठी तैनात नेपाळचे २८ कमांडो, नेपाळ पोलिसांचे १९ अधिकारी, सशस्त्र दलाचे २७ जवान आणि गुप्तहेर खात्यातील दोन अधिकारी यांना कोरोना संक्रमण झाले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.