मुंबई लोकल यार्डातच : केंद्राला राज्याकडून प्रस्तावच नाही

04 Oct 2020 15:50:02
Mumbai_1  H x W
 
 
 
 
मुंबई : अनलॉक प्रक्रीया सुरू झाल्यानंतर मुंबई लोकल केव्हा सुरू होणार असा प्रश्न वारंवार सरकारला विचारला जात आहे. उपनगरांतून शहरात जाणाऱ्या कामगारांचे हाल रोखण्यासाठी लोकल सुरू करा, अशी मागणी मनसेने आंदोलनाद्वारे केली होती. मात्र, सरकारची या प्रकरणी काहीशी भूमिका सावध असल्याचे दिसत आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी संकेत दिले आहेत.
 
 
 
मुंबई लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. लोकल सुरू होण्यासाठी अद्याप केंद्राला प्रस्तावच दिलेला नाही, त्यामुळे मनसेने या प्रकरणी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "मुंबईत सध्या कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. जनतेच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा आहे. कोरोना मृत्यूदर शून्य टक्क्यांवर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. लोकल सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती आहे.त्यामुळे सावधगिरी बाळगूनच हा निर्णय घेतला जाईल."
 
 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्याने लोकल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप रेल्वे मंत्रालयाला त्याबाबत कुठल्ही प्रस्ताव दिलेला नाही. रेल्वे विभागाला पत्रक दिल्यानंतर लोकल सुरू होण्याच्या प्रक्रीयेला आणखी वेळ लागेल. त्यामुळे त्वरित हे पत्रक देऊन लोकलबाबत निर्णय घ्यायला हवा. मुंबई लोकल बंद असल्याने अनेकांना कामावर जायचे कसे हा प्रश्न आहे. अनेकांवर काम बंद असल्याने उपासमारीची वेळ येत आहे, असे म्हणत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.

 
 
Powered By Sangraha 9.0