माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी भाजपात

04 Oct 2020 14:30:02

Shreyasi Singh_1 &nb
 
 
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसनेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह यादेखील राजकारणात उतरत आहेत. विशेष म्हणजे, श्रेयसी सिंह या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. श्रेयसी सिंह आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.
 
 
 
दिग्विजय सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतुल सिंह यांनी खासदार पदाची जबाबदारी पार पाडली. अनेक दिवसांपासून श्रेयसी सिंह राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या जनता दल पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला हा मोठा धक्का ठरतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0