चिनी सैन्याची कुंडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2020   
Total Views |

India China_1  
 
 
चिनी सैन्याची, सध्या कोणतीही लढाई न लढल्याने शांतता काळात अधोगती झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाला लढण्याचा अनुभव नाही. त्यांची शिस्त खराब आहे. सैनिकांची जमिनीवर लढण्याची क्षमता अतिशय कमी आहे. ज्या ज्या वेळेला सीमेवर त्यांच्यावर कठीण परिस्थिती येते, त्या वेळेला ते लगेच माघार घेतात. कठीण परिस्थिती निर्माण झाल्यास निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या युवा नेतृत्वात नाही. ते नेहमीच मागून येणार्‍या आदेशाची वाट पाहत असतात.
 
अनेक वर्तमानपत्रांतून चिनी लष्कराच्या ताकदीविषयी लिहिले जाते. जगातील सर्वात ताकदवान दुसर्‍या क्रमांकाचे सैन्य असल्याचे म्हटले जाते. त्यांची शस्त्रास्त्रे अत्याधुनिक आहेत. मात्र, साधनांच्या मदतीने प्रत्यक्ष लढाई लढतात ते सैनिक. उत्तम आधुनिक शस्त्रास्त्रे सैन्याची क्षमता वाढवतात. परंतु, या क्षमतेचा वापर करायचा की नाही, किंवा कसा करायचा, यासाठी आवश्यक असते ती इच्छाशक्ती. चिनी सैन्याकडे याची कमतरता आहे. हा लेख मी, माझ्या आणि इतर सैनिक मित्रांच्या गेल्या १५ ते २० वर्षांच्या भारत-चीन सीमेवरील कामाच्या अनुभवातून लिहिला आहे. त्यांनी चिनी सैन्याला गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या युद्धभूमीवर, वेगवेगळ्या सीमेवर, वेगवेगळ्या कालखंडात पाहिले आहे. चिनी सैन्याची लढण्याची क्षमता त्यामधून एक संदेश अगदी स्पष्टपणे मिळतो की, चिनी सैन्याची लढण्याची क्षमता जितकी दाखवली जाते त्यापेक्षा खूपच कमी आहे. काही वर्षांपूर्वी नथु ला खिंडीपाशी भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांपासून खूपच जवळ तैनात होते. तिथे आलेला एक अनुभव. एका दिवशी तिथे चिनी सैन्य मोठ्या आवाजात आनंदोत्सव साजरा करत होते. दुसर्‍या दिवशी त्यांना विचारणा झाली, तेव्हा त्यांनी सांगितले की, तिथे असलेली कंपनी आता परत जात आहे आणि त्यांचे चिनी सैन्यातील काम संपले आहे. ते आता सैन्य सोडून आपल्या आवडीचे काम सुरू करतील. चिनी सैन्य भारतीय सीमेवर येणे याला शिक्षा समजतात. असे सैनिक कसे लढतील, देशाकरिता आपले प्राण देतील का? ‘एलएसी’वर चिनी आणि भारतीय सैन्य अनेक वेळा आमने-सामने आले आहेत. अनेक वेळा त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आहे. परंतु, ज्या वेळेला आपल्या सैनिकांनी त्यांना आक्रमकता दाखविली, तेव्हा ते घाबरून लगेच परत जायचे.
 
 
 
युद्धाभ्यासाकरिता सर्वोत्कृष्ट वेचून आणलेले सैनिक
 
 
 
भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांनी एकमेकांबरोबर अनेक वेळा युद्धाभ्यास केला आहे. एक अभ्यास पुण्यातील औंध परिसरातही झाला होता. त्यावेळी लक्षात आले की, युद्धाभ्यासाकरिता त्यांनी आणलेली कंपनी हे सैन्यातून सर्वोत्कृष्ट वेचून आणलेले सैनिक होते. त्यांच्या विरुद्ध भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनची एक कंपनी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी होती. तरीही यामध्ये 50 टक्के स्पर्धा आपण जिंकल्या. आपली कंपनी ही त्याच बटालियनची एक कंपनी होती. मात्र, चिनी सैन्याने त्यांच्याबरोबर युद्धाभ्यासाकरिता आणलेले सैनिक पूर्ण सैन्यातून शोधून आणले होते. २०१४ मध्ये चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे काही अधिकारी मुंबईत भेटीला आले होते. दुसर्‍या दिवशी ते परत जाणार होते. परंतु, फ्लाईटची वेळ झाली तरीही चिनी जनरल झोपलेले होते. त्यांच्या कनिष्ठ अधिकार्‍यांना सांगण्यात आले की, त्यांना लवकर जागे करा; अन्यथा विमान निघून जाईल. परंतु, त्यांच्या कनिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, तशी शक्यता नाही. ज्या विमानाने ते जाणार ती चिनी इंटरनॅशनल फ्लाईट आहे आणि चिनी सैनिकी अधिकार्‍यांना सोडून ती फ्लाईट कधीही जाण्याची हिंमत दाखविणार नाही. म्हणजे, वरिष्ठ लष्करी अधिकारी झोपले आहेत म्हणून संपूर्ण विमान काही तासांसाठी उशिरा सोडण्यात आले. याला शांततेच्या काळातील रोग असे म्हटले जाते. चिनी सैन्य स्वतःला इतर चिनी नागरिकांपेक्षा उच्च दर्जाचे समजते. हीच सवय पाकिस्तानी सैन्यालाही झालेली आहे. सत्तेची चटक लागलेले सैन्य लढू शकत नाही.
 
 
सुदानमध्ये लढण्याची हिंमत नव्हती
 
 
२०१७ सालामध्येही अशाच प्रकारचा अनुभव आला होता. आफ्रिकेच्या सुदान देशात भारतीय आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये तैनात होते. त्या वेळी सुदानमधील बंडखोरांनी तिथल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कर्मचार्‍यांवर हल्ला केला. महिला कर्मचार्‍यांशी गैरव्यहार केला. मात्र, तिथे असलेले चिनी सैन्य लढण्याकरिता/कर्मचार्‍यांचे रक्षण करण्याकरिता पुढे आले नाहीत. कारण लढण्याची त्यांची हिंमत नव्हती. जेव्हा त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली, तेव्हा चीनने उलट बोंब मारली की, तुम्ही आमचे रक्षण करायला हवे होते. सुदानी बंडखोरांनी चिनी सैनिकांनी हल्ला केला, त्यात दोन चिनी सैनिक मारले गेले. त्यानंतर चिनी सैन्यामध्ये आणि सरकारमध्ये हाहाःकार माजला. त्यानंतर चीनने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सैनिक पाठवणे खूप कमी केले. नेमका हाच अनुभव गलवानमध्ये आला, जिथे भारतीय सैन्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला करत त्यांना फार मोठ्या संख्येने जखमी केले किंवा मारले. त्यानंतर आपले किती सैन्य ठार झाले ते स्पष्ट सांगण्याची चीन सरकारची हिंमतही झाली नाही. चिनी सरकार, सैनिक आणि नागरिकांची मनोधारणा आहे की, चीन एवढा ताकदवान आहे की, कोणताही देश आणि कोणत्याही देशाचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करू शकणार नाही. केवळ आधुनिक शस्त्रास्त्रे, त्यांचे फोटो, व्हिडिओ दाखवून प्रतिस्पर्धी देशाला घाबरवायचे, त्यांच्यावर मानसिक आघात करायचा, यामुळे ते न लढताच मागे जातील.पण, भारतीय सैन्याच्या बाबतीत त्यांची लढण्याची पद्धत चुकली.
 
 
 
चिनी सैन्याची कुंडली
 
 
 
१९७८ नंतर चीनने व्हिएतनामशी युद्ध हरल्यानंतर आपल्या आर्थिक ताकदीचा आणि मानसिक युद्धाचा, सैन्याच्या फोटोंचा आणि व्हिडिओचा वापर करून जगाला घाबरविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, भारताच्या बरोबर त्यांचे हे डावपेच उपयोगात आले नाहीत. चिनी सैन्याची, सध्या कोणतीही लढाई न लढल्याने शांतता काळात अधोगती झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाला लढण्याचा अनुभव नाही. त्यांची शिस्त खराब आहे. सैनिकांची जमिनीवर लढण्याची क्षमता अतिशय कमी आहे. ज्या ज्या वेळेला सीमेवर त्यांच्यावर कठीण परिस्थिती येते, त्या वेळेला ते लगेच माघार घेतात. कठीण परिस्थिती निर्माण झाल्यास निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या युवा नेतृत्वात नाही. ते नेहमीच मागून येणार्‍या आदेशाची वाट पाहत असतात. ज्या वेळेला २७-२८ ऑगस्टला भारतीय सैन्याने कैलास पर्वतावर आपले सैन्य तैनात केले, त्यावेळी ‘पीएलए’ला सांगण्यात आले की, प्रतिहल्ला करून भारतीय सैन्याला मागे ढकला. परंतु, हे करण्याची त्यांची हिंमत नव्हती. त्यांनी हल्ला करण्यास सरळ नकार दिला. चिनी नेतृत्वाला त्यांच्या सैन्याची ही कमजोरी नक्की माहीत आहे. म्हणून आता चीन अल्पसंख्याकांना सैन्यामध्ये भरती करण्याचा प्रयत्न करते आहे. उदाहरणार्थ-मंगोल्स जे डोंगराळ भागात राहतात आणि जे अतिशय टणक असतात, त्यांना सैन्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, मंगोल्स म्हणतात, जर भारत-चीन सीमेवर जायला हान चिनी तयार नसतील तर आम्ही का जावे?
 
 
सैनिकांचे मनोबल कमी
 
 
लडाखच्या भागात हिवाळा सुरू झाल्याने चिनी सैनिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सैनिकांची लवकर बदली करण्याच्या प्रयत्नात चीन आहे. भारतीय सैनिक अति उंच भागात लेह आणि कारगीलमध्ये दोन वर्षे राहतात. परंतु, चीन आपल्या सैन्याची तिथून काही महिन्यातच बदली करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणून सैनिकांचे मनोबल कमी आहे आणि त्यांची लढण्याची क्षमता खूपच कमी आहे. डेपसांग, प्लेन, फिंगर किंवा चुशुल किंवा स्पंगुल या सर्वच ठिकाणची उंची ही १५-१६ हजार फुटांवरून अधिक आहे. अशा ठिकाणी चिनी सैनिक लढू शकतील का? चिनी सैन्याने आपल्या सैनिकांना एवढ्या जास्त सोयी करून दिलेल्या आहेत की, त्यांचे पूर्ण लक्ष आपल्याला सोयी काय मिळतात यांच्याकडे लागलेले असते, म्हणजेच चिनी सैन्य मानसिकदृष्ट्या लढण्यासाठी तयार नाही. ‘ग्लोबल टाईम्स’ आणि चिनी नेतृत्व दादागिरी करते. परंतु, प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात मात्र चिनी सैन्य आक्रमक कारवाई करण्याच्या परिस्थितीत नाही. या सर्वांचा अर्थ थोडक्यात असा आहे की, जरी चीनकडे सर्वाधिक चांगली शस्त्रे आहेत, रस्ते सीमेपर्यंत येऊन पोहोचले आहेत, ५ जी नेटवर्क सीमेपर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्याकडे प्रचंड मोठी वाहने आहेत. परंतु, ही सर्व साधने उपलब्ध असली तरी सैनिकांचे काय? म्हणून येणार्‍या काळात, पुन्हा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल. परंतु, स्वतःहून लष्करी हल्ला करण्याची चिनी सैन्याची क्षमता संशयास्पद आहे. चीनने चुकून हल्ला करण्याचा निर्णय घेतला तरी त्यांची धुलाई होईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@