मुंगेर घटनेची सीबीआय चौकशी करा ! : मृताच्या कुटूंबियांची मागणी

30 Oct 2020 15:03:12
Munger Case_1  


पाटणा : बिहारच्या मुंगेरमध्ये दुर्गा पूजेनंतर मुर्ती विसर्जन करत असताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या झटापटीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटूंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी करत मुंगेरच्या माजी एसपी लिपी सिंह यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
 
मृताच्या बहिणींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “आमचे कुटूंब आता कसे चालणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आमचा भाऊ घर चालवणारा एकटा होता. कालपर्यंत घरी लग्नाचे विषय सुरू होते आज त्याला मुखाग्नी देण्याची वेळ येत आहे. लिपी सिंह या सर्वसामान्य गरीब कुटूंबातील असत्या तर त्यांना आमचे दुःख कळले असते., अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
 
 
मृताचे वडिल यांनी लिपि सिंह यांच्याविरोधात हत्येचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. अनुरागवर जेव्हा गोळ्या चालवण्यात आल्या तेव्हा मी स्वतः पाहिले आहे. पोलीसांनी जमावावर गोळ्या झाडल्या होत्या. लिपी सिंह यांच्यावर हत्येचा खटला चालवण्यात यावा, तो विद्यार्थी होता. जमावाचा हिस्सा नव्हता.”
 
 
लिपी सिंह यांना एसपीच्या पदावरून हटवण्यात आले आहे. वैशाली आणि माजी एसपी मानवजीत सिंह ढिल्लो आणि माजी डीएम रचना पाटील यांना मुंगेरच्या नव्या एसपी व डीएम बनवण्यात आले आहे. त्यानिमित्त डीआयजी मनू महाराज यांना लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. मृत्यू का झाला हा चौकशीचा विषय आहे, त्याबद्दल माहिती देण्यास पोलीसांनी नकार दाला आहे.






Powered By Sangraha 9.0