कमलनाथांना निवडणूक आयोगाचा झटका !

30 Oct 2020 19:52:21

Kamlnath_1  H x
 
नवी दिल्ली : मध्य प्रदेश कॉंग्रेसला निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा आयोगाने काढून घेतला. कमलनाथ यांनी पुन्हा एकदा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली. “यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाणार आहे.” असे निवडणूक आयोगाने सांगितले.
 
 
 
कमलनाथ यांनी वादग्रस्त ‘आयटम’ विधानाप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. त्यानंतर ४८ तासांमध्ये याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी भाजपचे उमेदवार इमरती देवी यांना कथीतरित्या 'आयटम' संबोधले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले होते की, “मी कोणाला असे बोललो नाही. जर यामुळे संबंधित व्यक्ती दुखावली गेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझे तसे म्हणण्याचा हेतू नव्हता.” राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणी कमलनाथ यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0