'फ्रेंच नागरिकांची हत्या करणाऱ्यांचा मुस्लिमांना अधिकार'

    दिनांक  30-Oct-2020 10:59:03
|

mahathir _1  H
क्वालालंपूर :
फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.महाथीर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत भडकाऊ भाष्य त्यांनी केले आहे. 'इतरांचा सन्मान करा' या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये महाथीर यांनी नीस हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. महाथीर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण १४ ट्विट केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, भूतकाळात झालेल्या नरसंहारासाठी कोट्यवधी फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मुस्लिम अद्यापही सूड म्हणून डोळ्याच्या डोळा मागत नाहीत. मुस्लिम असे करतही नाही. फ्रान्सनेदेखील असे करता कामा नये असेही त्यांनी म्हटले. त्याऐवजी फ्रान्सने आपल्या नागरिकांना दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्यास सांगितले पाहिजे. महाथिर यांनी आपल्या पोस्टमध्ये शाळेत शिक्षकाने प्रेषित पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख केला आहे.


महाथिर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना उद्धट म्हटले आहे. मॅक्रॉनवर टीका करताना त्यांनी म्हटले की, कोणत्याही धर्माचा अवमान करणार्‍या शिक्षकाची हत्या केल्याबद्दल संपूर्ण इस्लामला दोष देणे योग्य नाही. मॅक्रॉन हे सभ्य व्यक्ती आहेत, असे वाटत नाही. संतापलेल्या व्यक्तीच्या चुकीबद्दल आपण सर्व मुस्लिमांना दोष देता आणि त्यांच्यावर दोषारोप करता तेव्हा, मुस्लिमांनाही फ्रेंच लोकांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे. फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालून त्यातून फारसं काही साध्य होणार नसल्याकडेही महाथिर यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, चर्चमध्ये हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कारवाईत हा हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हा ट्युनिशियाचा नागरिक असल्याचे तपासात समोर आले आहे. हल्लेखोर हातात कुरानची प्रत आणि चाकू घेऊन चर्चमध्ये शिरला आणि त्याने तिघांची हत्या केली. गेल्या दोन महिन्यांत फ्रान्समध्ये हा तिसरा हल्ला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.