ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन

03 Oct 2020 11:05:07

atal tunnel_1  



रोहतांग :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या अटल बोगद्याचे आज करण्यात आले. जवळपास ९ किमी लांबीचा आणि १०००० फुटांहून अधिक उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे. या बोगद्याच्या उद्घाटनाला सीडीएस जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते.


सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या बोगद्याचं उद्घाटन करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले होते. पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील 'अटल टनल'च्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिमाचल प्रदेश येथील कुल्लु मनाली आणि लाहौल-स्पिति जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या ९ किलोमीटर लांब या बोगद्याचं काम गेल्या १० वर्षांपासून सुरु होतं.


‘अटल टनेल’ ठरणार गेमचेंजर

सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्‍या ‘अटल टनेल’चे उद्घाटन हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे करणार आहेत. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लडाख परिसरामध्ये लष्करी वाहतुकीसाठी आता जवळपास वर्षभर रस्ता खुला राहणे शक्य होणार आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रामुख्याने या प्रकल्पाने गती घेतली. एकीकडे चीन सीमावर्ती भागामध्ये रस्ते, महामार्गबांधणी वेगात करून पायाभूत सुविधांचा विकास करीत आहे, त्याला आता भारतानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेतदेखील भारत सीमावर्ती भागामध्ये करीत असलेल्या विकासकामांची माहिती दिली होती. चीनच्या वाढत्या आगळिकीचे तेही एक कारण आहेच. कारण, गेल्या काही वर्षांपासून चीनने सीमावर्ती भागात वेगवान बांधकामे करीत सामरिकदृष्ट्या काही प्रमाणात आघाडी घेतली होती. त्या तुलनेत यापूर्वीच्या सरकारांनी सीमावर्ती भागाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले होते. मात्र, आता ती कसर भरून काढण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत प्रामुख्याने चीनसीमेवर भारताचा वरचष्मा दिसणार, यात शंका नाही.


Powered By Sangraha 9.0