'पुलवामा हल्ला' इमरान खान सरकारची मोठी कामगिरी : पाक मंत्री

    दिनांक  29-Oct-2020 18:39:58
|
Fawad_1  H x W:
 
 
 
 
 
इस्लानमाबाद : पाकिस्तान हा दहशदवादाला पाठीशी घालणारा देश म्हणून आजवर वारंवार उघड झाले आहे. मात्र, आता पाक सरकारच्या मंत्र्यांनीच ही कबुली दिली आहे. पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ला हा इमरान खान यांच्या कारकीर्दीतील मोठी घटना आहे, असे वक्तव्य पाकच्या संसदेत केले आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमध्ये पुलवामा या भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यात ४० जवान हुतात्मा झाले होते. यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्धस्त केले होते.
 
 
 
यात मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले होते. हा कॅम्पला मसूद अजहरचा मेव्हणा मौलाना युसूफ अजहर चालवत होता. काही दिवसांपूर्वी एएनआयने पुलवामा हल्ल्यात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात पाकिस्तानला यासाठी कारणीभूत ठरवण्यात आले आहे. हल्ल्यातील आरोपी १९ आरोपींमध्ये मसूद अजहर, रौफ असगर, उमर फारुख यांचाही सामावेश आहे. सहा आरोपींना ठार करण्यात आले असून सात आरोपी अटकेत आहेत.
 
 
 
मुख्य आरोपी म्हणून पाकिस्तानी कमांडर मोहम्मद उमर फारूख याचे नाव होते. हा मसूद अजहरचा भाचा आहे. उमर फारूख त्याच्या साथीदारासोबत पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांत एका चकमकीत मारला गेला. या प्रकरणात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला पाकिस्तानात शरण देण्यात आले आहे. त्यानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी माहिती दिली होती. ‘तपासानंतर दीड वर्षानी या प्रकरणी चार्जशीट दाखल झाली आहे. दहशतवादी संघटना ‘जैश’ने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. संघटनेची पाळेमुळे पाकिस्तानातच आहेत.’
 
 
 
 
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.