‘फ्रान्स आणि भारत दहशतवादाविरोधात एकत्र येतील’

29 Oct 2020 14:44:00
France _1  H x



मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या टीकेचा भारतातर्फे समाचार

 
 

नवी दिल्ली : चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रावरुन सुरू असलेल्या विवादानंतर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यावर केल्या जात असलेल्या व्यक्तीगत टीकेची भारताने निंदा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत विरोधकर्त्यांना सुनावले आहे. कुठल्याही प्रकारे दहशतवादाचे समर्थन केले जाऊच शकत नाही, अशी भूमीका भारताने स्पष्ट केली आहे.
 
 
 
मॅक्रॉन यांनी कट्टरपंथी इस्लामविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. भारताने म्हटले की, “फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर व्यक्तीगत टीका आंतरराष्ट्रीय कूटनीतिक संवादाच्या मूळ सिद्धांतांचे उल्लंघन करते” फ्रान्स राष्ट्राध्यक्षांबद्दल अशाप्रकारची भाषा स्वीकार्य नाही. तसेच आम्ही बर्बर दहशतवादी हल्ल्यातील फ्रान्स शिक्षक यांच्या खूनाच्या घटनेचीही निंदा करतो तसेच पीडित कुटूंबीयांच्या आणि जनतेच्या सोबत आम्ही आहोत.”
 
 
 
भारताच्या या वक्तव्यानंतर भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनायन यांनी भारताच्या पाठींब्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. ते म्हणाले, दोन्ही देश दहशतवाद्यांच्या विरोधात एकत्र उभे असतील.” दरम्यान, मॅक्रॉन यांच्याविरोधात कित्येक मुस्लीम देशांनी टीका केली आहे. त्यांनी कट्टरपंथी इस्लामाविरोधात पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगचित्राचा बचाव केला होता. ते म्हणाले की, “कट्टरतावाद हा जगभरावर एक मोठे संकट आहे.” यावरून पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांनीही त्यांच्यावर टीका केली होती.
 
 
 
इमरान खान यांनी मॅक्रॉन यांचा इस्लामवर हल्ला, असा आरोप केला आहे. ते म्हणाले, “हे दुर्भाग्यपूर्ण आहे. इस्लामोफोबियाला पाठींबा देणारे मॅक्रॉन यांचे वक्तव्य आहे. त्यांनी दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी इसल्मावर हल्ला केला”, असा आरोप त्यांनी मॅक्रोन यांच्यावर केला आहे.






 
Powered By Sangraha 9.0